दुध दरावरुन इंदापुरात सोनाई डेअरी समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण, 'सोनाई' म्हणते…

Nov 28, 2023 - 19:53
Nov 28, 2023 - 19:53
 0  826
दुध दरावरुन इंदापुरात सोनाई डेअरी समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण, 'सोनाई' म्हणते…

आय मिरर

दुधाला प्रति लिटरला चाळीस रुपये हमीभाव मिळाला पाहिजे यासोबत प्रत्येक जिल्ह्यात दुधाचा दर समान असला पाहिजे या मागणीसाठी इंदापूर मधील सोनाई डेअरी समोर मंगळवार दि.२८ रोजी पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरु केलेय.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, माढा तालुक्याचे अध्यक्ष प्रताप पिसाळ पाटील, प्रशांत पाटील, अंबादास जाधव यांसह अनेक दुध उत्पादक शेतकरी, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेत.

राधाकृष्ण विखे पाटील हे दुग्धविकास मंत्री म्हणण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांचा नगर जिल्ह्यात सर्वात जास्त भेसळयुक्त दूध होतेस्वतःचा दूध संघ आहे 34 रुपये दूध दराचा जीआर काढून स्वतःचीच पाठ स्वतःच थोपटून घ्यायची मात्र त्या जीआरची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे काम त्यांचे होते. दुध दर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये असणारे सर्व शेतकऱ्यांच्या मुळावर थेट आणले. शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांचा जो नफा आहे खोक्यांच्या स्वरूपात सरकारला पोहोचवला जातोय असा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी यावेळी केला आहे.

दुधाला ३.५, ८.५ ला ३५ रुपये प्रति रुपये प्रति लिटर हमीभाव मिळाला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात दुधाचा दर समान असावा.दुध उत्पादकांच्या वाॅवचर वर दुध संघाचे नाव असावे. एस एन एफ वाढीचा दर कमी व समान असला पाहजे. महाराष्ट्रात गेली १५ वर्षात अन्न भेसळ प्रतिबंधक पथकांनी किती कारवाया केल्या व किती भेसळचोर आरोपींना शिक्षा किंवा दंड ठोठावला याची श्वेतपत्रिका काढावी.ज्या खाजगी व सहकारी प्लॅन्ट चालकांनी गेल्या तीन महिन्यापासून शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव दिला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, दुधाला दर मिळालाच पाहिजे,दुधाल दर न देणा-या सरकारचं करायच काय खाली मुंड वर पाय अशा घोणा देण्यात आल्या. या आंदोलनास संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वात इंदापूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

मागणी आणि पुरवठा व जागतिक बाजारपेठेतील बाजारभाव यावरती त्याचप्रमाणे देशभरातील अन्य राज्यांमधून दुधाचे उत्पादन व मालाचे साठे यावरती दुधाचे बाजारभाव अवलंबून असतात.गेल्या तीन-चार वर्षांपासून जागतिक बाजारपेठेमध्ये दुग्धजन्य पदार्थाचे दर भारताच्या बाजारपेठेपेक्षा कमी आहेत. त्याचप्रमाणे देशातील अन्य राज्यातील तेलंगणा, बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यात गेल्या वर्षी पर्यंत यापूर्वी दुधाचे उत्पादन कमी असल्याने महाराष्ट्रातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री त्या राज्यात होत होती. दूध, मिल्क पावडर व बटर खरेदी करून तेथील सहकारी संस्था त्यापासून बटर व पावडर पासून दूध बनवून त्याची पाऊच पॅकिंग मध्ये विक्री करत होते. त्यामध्ये वाहतुकीचा जीएसटी व अन्य खर्च यामुळे सदरच्या व्यवसायामध्ये त्या संस्थांना मोठ्या प्रमाणात तोटा येत होता व सदरची भरपाई त्या राज्यातील सरकार करून देत होते.ही बाब त्या त्या राज्यातील सरकारच्या लक्षात आल्यावर त्या त्या राज्यात दूध वाढीसाठी शेतकऱ्यांना थेट लाभार्थ्यांना सबसिडी दिल्यामुळे त्या राज्यात दुधाचे उत्पादन वाढले.

महाराष्ट्रात आजच्या परिस्थितीमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी ऐवजी त्या ठिकाणी झालेल्या दुधाच्या जास्तीच्या संकलनातून पिशवी बंद दुध करुन उर्वरित दुधाचे पॅकेजिंग करुन पुन्हा बाजारात विक्री करत आहेत. म्हणजेच दुग्धजन्य पदार्थ देशभरात विक्री होऊ शकत नाही या कारणामुळे खाजगी व सहकारी संघांकडे एप्रिल 2023 पासून मोठ्या प्रमाणात साठा शिल्लक पडून आहे सदरचा माल विक्री न झाल्याने मिळेल त्या ठिकाणी भाडोत्री गोदाम घेऊन हा माल ठेवण्यात आला आहे. तसेच कर्ज घेऊन दुधाचे पैसे दिलेले आहेत.आजच्या स्थितीला दूध खरेदी व उपपदार्थ निर्मिती करणे व ठेवणे हे सर्व पर्याय थांबलेले आहेत. त्यामुळे यावरती काय असेल तो निर्णय हा राज्य सरकारच घेऊ शकते आणि उपाय देखील सुचवू शकते. यात खाजगी व सहकारी संस्थांवर दुधाला दर देण्याचा पर्याय उरलेला नाही. अशी माहिती सोनाई दूधचे अध्यक्ष दशरथ माने व कार्यकारी संचालक विष्णू कुमार माने यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow