मराठा आरक्षणासाठी इंदापूरच्या कांदलगांवात मराठा तरुणांचे पुन्हा आमरण उपोषण,आजी माजी आमदारांना ही दिले निवेदन

Feb 13, 2024 - 07:30
 0  423
मराठा आरक्षणासाठी इंदापूरच्या कांदलगांवात मराठा तरुणांचे पुन्हा आमरण उपोषण,आजी माजी आमदारांना ही दिले निवेदन

आय मिरर (देवा राखुंडे)

मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.जरांगे पाटील यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील कांदलगांव मध्ये मराठा समाजातील तरुणांनी पुन्हा एकदा ११ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.या संदर्भात इंदापूर पोलीस आणि महसूल प्रशानाला निवेदन देण्यात आले आहे.

बंडू गोपाळ ननवरे आणि सौदागर बाळासाहेब ननवरे या दोघांनी गावातील मुख्य चौकात हे आंदोलन सुरु आहे. आजचा या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.यापूर्वी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या दोघांनी आमरण उपोषण केले आहे. तर कांदलगांव मध्ये शंभर दिवसाहून अधिक दिवस साखळी उपोषण देखील करण्यात आले आहे.

विधानसभेत विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाची बाजू मांडा…

आत्ताचे उपोषण सुरु करण्यात्पूर्वी कांदलगांव सह पंचक्रोशितील मराठा बांधवांनी आंतरवली सराटी येते १० फेब्रुवारी रोजी जरांगे पाटील यांची भेट घेत संवाद साधला. जरांगे पाटील यांचा आशिर्वाद घेऊन मायभूमीत परताच महाराष्ट्र विधानसभेत होणा-या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण आणि सगेसोयरे हा मुद्दा लावून धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठा समाजाच्या मागणीच्या समर्थनार्थ भूमिका मांडावी यासाठी मराठा समाज बांधवांनी रविवारी दि.११ फेब्रुवारी रोजी इंदापूरचे राष्ट्रवादी आमदार दत्तात्रय भरणे यांची भरणेवाडी निवासस्थानी भेट घेत निवेदन दिले आहे. याच सोबत भाजप पक्षाचे आमदार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मराठा समाजाची बाजू मांडावी व मराठा आरक्षण आणि सगेसोयरे हा मुद्दा लावून धरावा यासाठी भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना ही निवेदन देण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow