मोठी बातमी : इंदापूरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची माघार

May 2, 2025 - 16:37
 0  924
मोठी बातमी : इंदापूरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची माघार

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आज दाखल केलेले उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय भवानीमाता पॅनलच्या उमेदवारांची घोषणा झालीय असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सर्वपक्षीय पॅनल मधून योग्य त्या जागा न मिळाल्याने या निवडणुकीतून आम्ही माघार घेत असल्याची घोषणा पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.

दरम्यान इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काही जणांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आलाय.

कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या चिरंजीवांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावरून पोलिसांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीवेळ बारामतीच्या प्रशासकीय भावनातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

माजी आमदार स्वर्गीय राजेंद्र कुमार घोलप यांचे पुत्र छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिलेले अविनाश घोलप यांचे दोन सुपुत्र एक इंदापूर तालुका इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप व दुसरे नुकतेच संचालक असलेले पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आदित्य घोलप यांना यावेळी धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला जातोय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow