सोनसाखळी चोराला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 5 लाख 6 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

आय मिरर
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील म्हाळुंगे, चाकण, देहूरोड, रावेत ,निगडी आणि पुणे ग्रामीण मधील लोणावळा अशा पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
प्रेम बीरम नानावट अस अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 4 लाख 56 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 50 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 5 लाख 6 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीला अटक केल्याने जुन्या 6 आणि नवीन 4 अश्या एकूण 10 गुन्ह्याची उकल झाली आहे.
What's Your Reaction?






