बिग ब्रेकिंग | पुरंदर उपसा सिंचन वरून सुप्रिया सुळेंचं बुधवार पासून उपोषण, म्हणाल्या...

आय मिरर
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नावरून आक्रमक झाल्या आहेत. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाणी प्रश्नावरून सुळे आता उपोषण करणार आहेत. परवा बुधवारी दिनांक 23 एप्रिल रोजी आपण सकाळी दहा वाजल्यापासून पुण्यात सिंचन भावन समोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी स्वतः सोशल मीडियातून घोषित केलंय.
पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील पंप स्टेशन वरती आज खासदार सुप्रिया सुळे यांनी तीन वाजता संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी एक आठवड्यापूर्वी नियोजन केले होते.मात्र या बैठकीला केवळ कार्यकारी अभियंता अशोक शेटे हेच उपस्थित राहिले.
शिवाय त्या ठिकाणी कोणतीही बैठकीच्या दृष्टीने तयारी केली नव्हती एकूणच प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट सिंचन भवनासमोर उपोषणाची घोषणा केली आहे.
यापूर्वी देखील त्यांनी 9 एप्रिल रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील 400 मीटर रस्त्याच्या प्रश्ना संदर्भात उपोषण करत सरकारचे लक्ष वेधले होते. आता पुन्हा प्रशासनावर पाणी प्रश्नावरून नाराजी व्यक्त करत त्यांनी उपोषणाची घोषणा केली आहे.
हे सरकार खुर्ची सोडा सतरंजी देखील उपलब्ध करून देत नाही अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकार वरती नाराजी व्यक्त केली आहे. आठ दिवसांपूर्वी माझ्या आजच्या बैठकीचे नियोजन केलं होतं कार्यकर्त्यांनी तसं प्रशासनाला कळवलं होतं मात्र तरी देखील या ठिकाणी एक अधिकारी वगळता इतर कोणताही अधिकारी उपस्थित राहिला नाही शिवाय या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने बसण्याची देखील व्यवस्था केली नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे.
या संदर्भात आता बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आपण उपोषणाला बसणार असल्याचं सुळे यांनी घोषित केलंय.
What's Your Reaction?






