जाचक बापू म्हणाले,श्री छत्रपती कारखाना हा 1 लाख लोकांचा प्रपंच ; एक वेळ मला विसरा पण या पृथ्वीराज ला नको !

आय मिरर
ज्यांना पॅनल उभा करता आला नाही त्यांनी शब्द कसा पूर्ण करावा. मला त्यांच्यावर टीका करायची नाही, पण माझ्यावर खोटी नाटी टीका केली तर कागदपत्रांसह खुलासा करायला तयार आहे.छत्रपती कारखाना हा 1 लाख लोकांचा प्रपंच आहे, त्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या खोट्या आरोपांना बळी पडू नका एकेकाळी छत्रपती कारखाना ऊस उत्पादकांना चार आकडी दर देत होता तर कामगारांना 52 टक्के बोनस देत होता. ते दिवस परत आणायचे आहेत.विशेष म्हणजे या पॅनल मध्ये दोन पृथ्वीराज आहेत,एकवेळ मला विसरा पण या युवा असणाऱ्या पृथ्वीराज घोलप यांना विसरा नका असं आवाहन राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष आणि जय भवानी माता पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राजाचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचं माजी संचालक आणि सभासदांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी 5 मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री भवानी मातेच्या मंदिरात श्री जय भवानी माता पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक बोलत होते.
पृथ्वीराज जाचक म्हणाले की,बरोबर 22 वर्षानंतर आज योग आला. अजित पवार असतील दत्तात्रय भरणे असतील मी स्वतः असेल आम्ही एकत्र आलो, आता एकत्र आल्यामुळे छत्रपतीला पूर्वीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. खरंतर कारखाना बिनविरोध होणे गरजेचे होते. सध्या सर्वत्र सहकारामध्ये बिनविरोधाचे वारे सुरू झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मी सर्वांना श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा बिनविरोध करण्यासाठी फोन केले होते,शेवटी आम्ही 21 जून काही करू शकणार नाही त्यासाठी तुमची सर्वांची साथ पाहिजे पण शेवटी लोकशाही आहे.
13 मे 1956 साली आपल्या कारखान्याचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते मंडप होता. पण बारावीला संध्याकाळी प्रचंड वारा सुटला आणि वादळात मंडप उडाला. जुना काळ होता सर्व जण म्हणाले हा अपशकून झाला. हा कारखाना उभा राहणार नाही. त्यावेळी संस्थापक म्हणाले होते छत्रपती हा कसल्याही वादळाला तोंड देईल आणि तो उभा राहील हा विश्वास होता.
पुढचे दिवस अतिशय अडचणीचे आहेत पण सर्वांनी मिळून त्याला तोंड द्यायचा आहे. त्याला तुम्ही सर्वजण साथ द्याल याची मला खात्री वाटते.सुनील काळे यांनी एक फलक लावला होता टायगर अभी जिंदा है. मला त्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. त्यांनी संपूर्ण पॅनेल मागे घेतला. हे निवडणूक कोणाचे नेतृत्व करण्यासाठी नाही तर कारखाना चांगलं चालवण्यासाठी लढायची आहे.
महाराष्ट्रात पहिला ऊस तोडणीचा हार्वेस्टर छत्रपती कारखान्याने आणला,छत्रपती हा राज्यात पहिला कारखाना आहे की ज्याने राज्यात पहिल्यांदा ऑनलाईन साखर विकली. होत असलेल्या निवडणुकीसाठी उभा केलेल्या पॅनलमध्ये तीन कृषी पदवीधर, शिक्षक वकील डॉक्टर रिटायर आर्मी वाले असे जाणते उमेदवार असल्याने उभा केलेला पॅनल हे सर्व गुणसंपन्न आहे. प्रत्येक जण छत्रपती कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी लढतोय, संधी पुन्हा एकालाच मिळत असते त्यामुळे नाराज होऊ नका.माझी 22 वर्षे गेली तुम्ही 5 वर्षे थांबू शकत नाही का.तुम्ही 18 मे रोजी मतदान रुपी आशीर्वाद द्या,हा कारखाना चालवून नाही पळवून दाखवतो असे जाचक म्हणाले.
9 महिन्यात साखर काढण्याचा विक्रम छत्रपती सहकारी साखर कारखान्याने केला आहे. जो विक्रम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी मोडला नाही. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांनी आपला ऊस याच कारखान्याला गाळपाला घालावा असे आव्हान मी करतो. कारखाना आर्थिक संकटात आहे तो बाहेर काढण्यासाठी हे खूप महत्त्वाच आहे.
माझी सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाषण व्हायरल केली जातात,मी मामावर दादावर टीका केली मी कुठे नाही म्हणत आहे,आता आमचं जमलं आहे.आगे आगे देखो होता है क्या हे सांगायला ही जाचक विसरले नाहीत.
What's Your Reaction?






