इंदापूर विधानसभेचं कसं फडणवीस-दादा सांगतिल तसं ! मग का रंगलयं इंदापूरात बॅनरवाॅर ?

Jul 5, 2024 - 09:38
Jul 5, 2024 - 09:38
 0  2394
इंदापूर विधानसभेचं कसं फडणवीस-दादा सांगतिल तसं ! मग का रंगलयं इंदापूरात बॅनरवाॅर ?

आय मिरर

पुण्याच्या इंदापूरात गेल्या दोन दिवसापासून बॅनर वाॅर पाहायला मिळत असून भाजप राष्ट्रवादीच्या बॅनरबाजी नंतर आता यात शरद पवार गटाने देखील उडी घेतली आहे."आज पर्यंतचा इतिहास साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार" " आता कसं साहेब म्हणतील तसं विधानसभा 2024" अशा आशयाचा बॅनर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर शहरातील न्यायालयासमोरील जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर लावण्यात आला आहे.

ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती अगदी त्याच शेजारी राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केली होती. आणि या दोन बॅनरच्या मधोमध आता शरद पवार समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटलांच्या अपक्ष असणाऱ्या बॅनरच्या मध्येच शरद पवारांचा बॅनर लावल्यामुळे या ब्यानरच्या आता तालुक्यात चर्चा रंगली आहे.

ज्या ठिकाणी मागील दोन दिवसात भाजपचे जेष्ट नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी सर्वात प्रथम बॅनर लावला होता.यावर आमाचा स्वाभिमान आमचे विमान,आमचं आता ठरलयं लागा तयारीला विधानसभा - 2024 असं लिहण्यात आलं होतं.यातून थेट अपक्ष विधानसभा लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. 

तर याच बॅनर ला राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाकडून खुन्नस देण्यात आली. आमचं ठरत नसतं आमचं फिक्स असतं,विकासाची परंपरा राखुया चला विजयाची हॅट्रीक पूर्ण करुया अशा आशयाचा बनर लावण्यात आला. 

तोच गुरुवारी रात्री उशीरा या दोन्ही बॅनरच्या अगदी मधोमद शरद पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली असून तुम्हा दोघांनाही जेष्ट नेते शरद पवार भारी आहेत असाच स्पष्ट इशारा देण्यात आला आहे." आता कसं साहेब म्हणतील तसं विधानसभा 2024" असं लिहिण्यात आला आहे. तर याच्या समोरील बाजूला आणखी एक बॅनर लावण्यात आला असून या बॅनर वरती "आज पर्यंतचा इतिहास साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार" असं लिहण्यात आले आहे.

फडणवीस दादांनी निर्णय देण्याआधिचं त्यांच्या निर्णयास इंदापूरात मुठमाती…

महायुतीची इंदापूर विधानसभेची उमेदवारी कोणाला द्यायची याचा सर्वस्वी निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील तो निर्णय सर्वमान्य असे नुकतेच हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांनी बोलून दाखवले होते.मात्र अगदीचं आठ दिवसातचं फडणवीस आणि दादांचा निर्णय येण्यापूर्वीचं इंदापुरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या शब्दाला मुठमाती दिली आहे. त्यामुळे नेत्यांचा निर्णय कार्यकर्ते मान्य करणार का? 

इंदापूर शरद पवारांचा बालेकिल्ला……

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते शरद पवार यांना बनवणारा मोठा वर्ग इंदापूर तालुक्यात आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत त्याचा अनुभव ही अजित पवार गट आणि भाजपाला आला.सुनेत्रा पवार यांच्या बाजूने बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरलेले असताना केवळ सामान्य मतदार आणि फाटक्या कार्यकर्त्यांच्या जिवावर शरद पवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर मधून 25 हजार हून अधिकचं लिड मिळवण्यात यशस्वी झाले.यावरुन आजही शरद पवारांच्या इंदापूर विधानसभेतील ताकतिचा अंदाज येतो.

पवार गटाकडून आप्पासाहेब जगदाळे,प्रविण माने असु शकतात दावेदार…

आजपर्यंत इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द हर्षवर्धन पाटील अशी लढत झाली आहे. सरळ सरळ पहायला गेलं तर पवार विरुध्द पाटील असाच संघर्ष पहायला मिळाला. यात तीन विधानसभा हर्षवर्धन पाटील अपक्ष लढलेत तर दोन विधानसभा काँग्रेसच्या चिन्हावर आणि एक भाजपाच्या लढले आहेत.2024 च्या विधानसभेत हर्षवर्धन पाटील यांसह दत्तात्रय भरणेंना शह देण्यासाठी शरद पवार तगडा उमेदवार मैदानात उतरवतील असं जानकारांचे मत आहे.यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आणि बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे चर्चेत आहेत. तर पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांचं ही नावं आघाडीवर आहे. सध्या प्रविण माने अजित पवार गटात असले तरी प्रविण मानेंकडून विधानसभेची तयारी सुरु झाल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.त्यामुळे आगामी काळात इंदापूर विधानसभा निवडणूकीत प्रमुख पक्षांत तिरंगी लढत पहायला मिळू शकते.

सध्या इंदापूरातील बॅनरवाॅर वर महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते काय निर्णय घेणार ? विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजण्यापूर्वीचं इंदापूरात बॅनरवाॅर चांगलेचं रंगले असून उमेदवारीची शाश्वती कोणालाचं नसल्याने त्यांचे कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत.त्यातूनचं त्यांनी बॅनरवरुन एकमेकांवर वार करण्यास सुरवात केली आहे.मात्र यावर ज्यांना उमेदवारी हवीय ते काही बोलायला तयार नाहीत.कार्यकर्ते मात्र नेत्यांच्या गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत. महायुतीत आणि महाविकास आघाडीच्या विधानाभेच्या जागा वाटपात पहिली चर्चा इंदापूर वरचं करावी लागतीय की काय अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.त्यामुळे नेते मंडळी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow