'पुरंदरमध्ये माझी एक इंच जमीन दाखवा ती जमीन त्याच्या नावावर करते' खा.सुळेंच खुलं चॅलेंज ; वाचा नेमकं काय घडलं होतं

आय मिरर
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पाच मे रोजी सायंकाळी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील प्रस्तावित विमानतळाला विरोध दर्शवणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला आहे. या संवादावेळी एकाने खासदार सुप्रिया सुळे यांना तुमची जमीन पुरंदर तालुक्यात आहे म्हणत विमानतळा बाबत तुमची नक्की भूमिका स्पष्ट करा असं यावेळी सात गावातील लोकांनी म्हटलय.यामुळे सुळे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न लोकांकडून करण्यात आला.मात्र विमानतळाला माझा विरोध नाही मात्र जागेला माझा विरोध असल्याचं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ज्या भागातील लोक जमीन द्यायला तयार असतील त्या भागात विमानतळ करावे. जिथं लोकांचा विरोध असेल त्या भागात लोकांवर बळजबरी केली जाऊ नये असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे मांडल्या. पोलिसांनी कशा प्रकारे दडपशाही केली.चुकीचे गुन्हे दाखल केले याबाबत माहिती दिली.
"पुरंदर मध्ये माझी एक इंच जमीन दाखवा ती जमीन त्याच्या नावे"
तर एका शेतकऱ्याने पुरंदर तालुक्यात सुप्रिया सुळे यांची जमीन आहे असा आरोप केला. याबाबत त्याने थेट सुप्रिया सुळे यांना विचारणा केली. यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,माझी शरद पवारांची, सदानंद सुळे किंवा प्रतिभा पवार यांची एक इंच जमीन देखील इथे नाही. कुणीही सातबारा दाखवा ती जमीन त्याच्या नावे करून देते.
कोणीही कुठेही आमच्या जमिनी असल्याचं सांगत,पण ते खर नाही. मी सरकारला टॅक्स भरते.त्यामुळे माझ्याकडे येणार उत्पन्न एक नंबरचे आहे. आम्ही जमीन घेतली तर ती आमच्या नावाने असेल. आमच्या नावाचा गैरवापर केला जातोय.अनेक ठिकाणी माझ्या जमिनी आहेत असं सांगितलं जात पण ते खर नाही असं सुळे म्हणाल्यात.
कृती समितीत काम करणार...
खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी विमानतळ विरोधासाठी कृती समिती स्थापन करण्याची सूचना केली. या कृती समितीमध्ये पक्षविरहित काम करूया असं त्यांनी म्हटलंय.प्रत्येक गावातील दोन व्यक्ती या कृती समितीमध्ये घ्याव्यात असं त्यांनी सुचवलं आहे. त्याचबरोबर या कृती समितीमध्ये मी स्वतः देखील काम करेल. समितीच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांची भेट घेऊ. हे विमानतळ आम्हाला नको आहे हे त्यांना सांगू. त्याचबरोबर पुरंदरचं अंजीर,सीताफळ त्यांना भेट देऊ. मी तुमच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
आज शिष्ट मंडळासह पोलिस अधीक्षकांना भेटणार...
दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा पाढाच आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडला. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच म्हणजेच लाटीचार्ज, दगडफेक होण्यापूर्वी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतलं होतं. त्या तरुणांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर बैलगाडी चालकांवर देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 307 सारखा गंभीर गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. शासनाने आमची ही मुले सोडली नाही, तर आम्ही पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करू आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या. अस यावेळी शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना म्हटलंय, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन केला आणि आज मंगळवारी दुपारी सासवड येथे पंकज देशमुख यांच्या समवेत भेट निश्चित केली आहे. सात गावांचं शिष्टमंडळ आणि खासदार सुप्रिया सुळे या आज पंकज देशमुख यांची यासंदर्भात भेट घेणार आहेत.
What's Your Reaction?






