मोठी बातमी | इंदापूर सहाय्यक निबंधक कार्यालयात कळसचा शेतकरी पेट्रोलची बाटली घेऊन आला ! मग काय घडल ? वाचा सविस्तर 

Apr 10, 2024 - 13:32
Apr 10, 2024 - 13:49
 0  3252
मोठी बातमी | इंदापूर सहाय्यक निबंधक कार्यालयात कळसचा शेतकरी पेट्रोलची बाटली घेऊन आला ! मग काय घडल ? वाचा सविस्तर 

आय मिरर(देवा राखुंडे)

पुणे जिल्ह्यातील इंदापूर सहाय्यक निबंधक कार्यालयात एका शेतकऱ्याने अंगावरती पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. बुधवारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पोपट विठोबा सांगळे रा.कळस असं या शेतकऱ्याचे नाव आहे.

सांगळे हे गेल्या वर्षभरापासून बिरंगुडी विकास सेवा सहकारी संस्थेकडे पीक कर्जा करिता हेलपाटे मारत आहेत. मात्र स्थानिक नेते प्रताप पाटील हे सोसायटीच्या सचिवाने पीक कर्ज देऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप या शेतकऱ्याचा आहे.आपल्याला कर्ज न मिळाल्याने तीन एकर द्राक्षे बाग काढून टाकल्याची माहिती ही या शेतक-याने दिली. प्रताप पाटील हे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे जवळचे नातलग आहेत.

दरम्यान या घटनेनंतर आम्ही प्रताप पाटील यांसोबत भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

गेल्या आठवडाभरापूर्वी देखील प्रताप पाटील यांच्या चिरंजीवावरती वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.प्रताप पाटील यांच्या मुलाने भाजपचे पदाधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आवमान जनक वक्तव्य केल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत केला होता. याला काही दिवस होतात ना तोच आज नव्या वादाला तोंड फुटले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow