अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रा.शिवाजी बंडगर भडकले ! केलं थेट आमदारांच्या मर्दानगीलाचं चॅलेंज
आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
कालवा सल्लागार समितीतील आमदारांनी ज्या तत्परतेने उजनी धरणातील पाणी संपवण्याची मर्दानगी,हिम्मत दाखवली ,त्याच तत्परतेने आता वरच्या धरणातून पाणी उजनीत आणण्याची मर्दानगी हिम्मत दाखवावी आणी आमदारांचे बटीक बनलेल्या अधिका-यांवर देखील कारवाई व्हावी असा घणाघाती हल्ला उजनी धरणग्रस्त संघर्ष हिमतीने अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी उजनी च्या पाण्याबाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर केला.
शनिवारी दि.०३ फेब्रु रोजी सोलापूरात उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर ला एका कार्यक्रमा निमित्त आले असता पत्रकार परिषदेत वरच्या धरणातून पाणी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. या वर करमाळा ,इंदापूर तालुक्यातून तीव्र प्रतिक्रीया येत असून उजनी धरणग्रस्तांच्या चिंतेत भर पडली आहे.
उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने 1 तारखेलाच वरच्या धरणातून पाणी उजनीत सोडावे या मागणीसाठी भिगवण भव्य रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाला भरपूर प्रतिसाद ही मिळाला. या पार्श्वभूमीवर अजित दादा पवार यांनी आज वरच्या धरणातून पाणी सोडणार नसल्याचे जाहीर केले आहे .यामुळे उजनी जलाशय काठावरील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली असून लोकांमधे संतापाची लाट निर्माण झाली आहे.
कालवा सल्लागार समितीत असणार्या सर्व आमदारांवर आता लोक तोंड सुख घेऊ लागले आहेत. कालवा सल्लागार समितीतील अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता पुढे येवू लागली आहे.याबाबत पुढील दोन दिवसात बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल असे ही प्रा.बंडगर म्हणाले.
What's Your Reaction?