ती कॉलेजला निघाली होती मात्र वाटेतच नियतीनं डाव साधला,अन् कुटुंबाच्या आक्रोशाने परिसर हळहळला 

Dec 24, 2023 - 06:42
 0  1372
ती कॉलेजला निघाली होती मात्र वाटेतच नियतीनं डाव साधला,अन् कुटुंबाच्या आक्रोशाने परिसर हळहळला 

आय मिरर

सोलापूर विद्यापिठासमोर पुण्याकडून सोलापूर कडे निघालेल्या कार ने रिक्षाला जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झालाय.यात सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या एका विद्यार्थीनीचा मृत्यू झालाय तर अन्य दोन विद्यार्थी जखमी आहेत.भाग्यश्री कांबळे असं मृत विद्यार्थीनीचे नांव आहे. 

अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

काॅलेजसाठी निघालेल्या भाग्यश्री ला काळ असा येईल याची तसूभर देखील कल्पना नव्हती.ती काॅलेजला निघाली होती मात्र वाटेतचं नियतीनं डाव साधला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूने कुटुंबाने फोडलेला टाहो आक्रोश मन सुन्न करणारा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जवळील कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या एमएच १३, सीटी ९४७९ क्रमांकाच्या रिक्षाला सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली. 

रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (वय १९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 

या अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले (वय १४) हा आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

भाग्यश्रीच्या मृत्यूने कोंडीत हळहळ…

भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे. भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow