ACCIDENT ऑटो रिक्शा आणि शिवशाहीच्या भीषण अपघातात रिक्षाचा चुराडा ! तिघांचा मृत्यू

Apr 8, 2024 - 08:21
 0  1135
ACCIDENT ऑटो रिक्शा आणि शिवशाहीच्या भीषण अपघातात  रिक्षाचा चुराडा ! तिघांचा मृत्यू

आय मिरर

रायगडमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई -गोवा महामार्गावर माणगावमध्ये हा अपघात झाला आहे.

ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला आली असताना हा अपघात झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे. बसचं देखील नुकसान झालं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीक शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगाव येथील मानस हॉटेल समोर आली असता रिक्षा आणि या बसमध्ये अपघात झाला. सकाळी साडआकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

या अपघातामध्ये रिक्षात असलेले दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे व आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मात्र या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow