सांगली सुन्न झाली ! बापानेच पोरीचा गळा घोटला तर एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली ; नेमकं काय घडलं

आय मिरर
सांगली जिल्हा सध्या दोन घटनांमुळे सुन्न झाला आहे. आधी नेलकरंजीत शिक्षक असणाऱ्या बापानेच मुलीचा बळी घेतला. कारण फक्त मुलीला सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या होते. तर अडपाडीत गावातील चार तरूणांच्या लैंगिक आणि मानसिक अत्याचारास कंटाळून 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली.यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट असून अशा प्रकरणांच्या पाळेमुळापर्यंत पोलीस पोचणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.
नेलकरंजीत बापाने स्वतःच्या मुलीला सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने बेदम मारहाण करून जीव घेतला होता. या प्रकरणाने जिल्हा हळहळला आणि हादरला होता.
हे ताजे प्रकरण असतानाच अन्य एका शालेय विद्यार्थिनीचा नराधमाच्या टोळीने बळी घेतला. यामुळे आता शालेय आणि अल्पवयीन मुलीची सुरक्षतीता धोक्यात असल्याचं समोर आलं आहे.
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणी या गावामध्ये एका शाळकरी मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर पीडितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीमध्ये शिकणारी मुलगी ही सांगली तालुक्यातील एका गावात कुटुंबासोबत राहत होती. याच गावात असणाऱ्या माध्यमिक शाळेमध्ये दहावीचे शिक्षण घेत होती. शाळेत येताना जाताना गावातील चार तरुण तिला त्रास देत होते. रस्त्याने जाताना येताना हे आरोपी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. त्यासोबतच घरच्यांच्या फोनवर फोन करून तिला त्रास देत होते. यापैकी एकाने रविवारी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिने आपबीती आईवडिलांना सांगितली.
पीडितेने रविवारी सर्व घटना सांगितल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे ठरवले. सोमवारी ते पोलिस ठाण्यात जाणार होते त्यापूर्वीच तिने राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले.
या सर्व प्रकरणाचा स्थानिक पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि पोलिसांनी पंचनामा केला असून याप्रकरणी राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रमुख संशयित आरोपी राजू गेंड याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
What's Your Reaction?






