'माऊली माऊली' च्या गजरात निरात माऊलींना घातलं निरास्नान... माऊलींच्या सोहळ्याचा पुणे जिल्ह्यात प्रवेश
आय मिरर
पंढरपूरहून आळंदी कडे परतीच्या प्रवासाला निघालेला माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला.पुणे जिल्ह्यातील नीरा नदीकाठच्या नीरा शहरामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याच आगमन सकाळी नऊ वाजता झाले तत्पूर्वी नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना परतीच स्नान घालण्यात आल.
माऊली माऊलीचा गजर करत वरून राजाच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आलं. यानंतर हा पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी निरा येथील विठ्ठल मंदिरात विसावला आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदी काठावर स्नान झाल्यानंतर परतिच्या वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते.
माऊलींच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथापुढे आणि रथा मागे चालणाऱ्या वारकऱ्यांना ते उभे असलेल्या ठिकाणी माऊलींच्या पादुका नेऊन त्यांना स्पर्श दर्शन देण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी या वारकऱ्यांना या स्पर्श दर्शनाचा लाभ देण्यात आला नव्हता.
त्यामुळे वारकऱ्यांनी माऊलींचा रथ अडवला होता... मात्र यावर्षी कोणताही वाद-विवाद तंटा न होता वारकऱ्यांना माऊलींच स्पर्श दर्शन मिळाले आणि वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
What's Your Reaction?