दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा गेला जीव; गोंदियात काय घडलं

May 16, 2024 - 19:00
May 16, 2024 - 19:02
 0  172
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा गेला जीव; गोंदियात काय घडलं

आय मिरर

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात असलेल्या सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. यात संस्थापक आणि एका शिक्षकांचा वाद झाला. मात्र, यात मध्यस्थी करायला गेलेल्या संस्था उपाध्यक्षांनाच आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना आज उघडकीस आली. यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

हत्या झालेल्या सेवानिवृत्त लिपिक/उपाध्यक्षाचं नाव मुकुंद बागडे असून ते 60 वर्षांचे होते. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच मुकुंद बागडे यांचा मृत्यू झाल्याने सर्वसामान्य लोक हळहळ व्यक्त करत आहे

सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथे शाळेच्या संस्थेची सभा आयोजित करण्यात आली होती. संस्थेची सभा संपली आणि सदर शाळेतील शिक्षक आरोपी हिरालाल खोब्रागडे (वय ५२) यानी अचानक येऊन संस्था अध्यक्ष तथा शाळेचे प्राचार्य महेंद्र मेश्राम यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यामध्ये आरोपीने “माझं आयुष्य बरबाद केलं” असं म्हणत मुख्याध्यापकावर हल्ला केला. यावेळी मुकुंद बागडे वाद मिटविण्याच्या उद्देशाने मध्यस्थी करण्यासाठी गेले. यावेळी खोब्रागडे यानी रागाच्या भरात मुख्याध्यापकांना सोडून मुकुंद यांनी मारहाण केली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने मुकुंद हे जागीच बेशुद्ध झाले.

मुकुंद यांना प्राथमिक उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, परिस्थिती गंभीर असल्यामुळे गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. परंतु पहाटे 3 वाजताच्या दरम्यान त्यांचं निधन झालं. देवरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध भांदवी कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास देवरी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow