शरद पवारांचं राजकारण विश्वास घातकी ! भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळेंचा आरोप

आय मिरर
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचं राजकारण हे अत्यंत विश्वासघातकी आहे असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांनी इंदापूर मधील पत्रकार परिषदेत केलाय. यासोबतच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसमध्ये असुरक्षित वाटत होतं म्हणून त्यांनी भाजपचा आधार घेतला असा टोलाही वासुदेव काळे यांनी नाव न घेता लगावला आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला राम राम ठोकून शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीने इंदापुरात तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये वासुदेव काळे बोलत होते.
यावेळी प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, माऊली चवरे, तानाजी थोरात, माऊली वाघमोडे, पांडुरंग शिंदे,राजकुमार जठार,हर्षवर्धन कांबळे आदी उपस्थित होते.
ज्यांना काँग्रेस राष्ट्रवादीत असुरक्षित वाटत होतं ते भाजप शिवसेनेत आले होते. त्यांनी भाजपचा आधार घेतला होता. पश्चिम महाराष्ट्रात एखादा दुसरा प्रवेश झाला म्हणजे फार गळती लागली असं नाही कदाचित स्थानिक परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतले असावेत. राज्यात राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसच सरकार असताना सत्तेमधील पक्ष फुटले ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असावी, याचा अर्थ राज्यातील लोकांचा आणि राज्यातील नेत्यांचा राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस वरती विश्वास राहिला नसल्याचं काळेंनी म्हटलं आहे.
What's Your Reaction?






