बारामतीकरांना भेटून आनंद झाला - खा.सुनेत्रा पवार

Jun 20, 2024 - 15:20
 0  775
बारामतीकरांना भेटून आनंद झाला - खा.सुनेत्रा पवार

आय मिरर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या राज्यसभेवरती नियुक्त झाल्यानंतर प्रथमच आज बारामती मधील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी दाखल झाल्यात. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे.

राज्यसभेवर निवड झाल्यानंतर मी पहिल्यांदाच बारामतीत आले. मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्याच मतदारांचे जनतेचे आभार मानायचे होते. त्यानिमित्ताने मला त्यांना भेटायचं होतं यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना भेटून मला आनंद झाला, त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे त्या सर्वांचे खूप आभार अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांनी दिली.

सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार का ? यावर विचारले असता त्यांनी याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे म्हटले आहे.

आपली पुढील वाटचाल कशी असेल याबद्दल सुमित्रा पवारांना विचारलं असता त्या म्हणाल्या माझी आत्ताशी सुरुवात आहे. जनतेच्या ज्या काही अडचणी असतील मागणी असतील त्यांची सेवा करण्याची संधी मला त्यांनी दिलेली आहे.त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे मला जे योगदान देता येईल ते मी त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न करील.असं त्या म्हणाल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow