दोन पैसे धंदा कमी झाला तरी चालेल पण रोखीत कर नाही तर लाखाचे बारा हजार होतील - अजित पवार

आय मिरर
इंधन विक्रीचा धंदा हा व्यापारी दृष्टिकोनातून करायचा असतो,उद्या कोणीही कितीही जवळचा आला माझ्या वाहनात पेट्रोल फुकट टाका फुकट नाही उधारीवर टाका असं सांगितलं तर अजिबात उधारी ठेवू नका.
दोन पैसे कमी धंदा झाला तरी चालेल पण इथे बोर्ड लावा आज रोख उद्या उधार, नाहीतर लवकरच लाखाचे 12 हजार व्हायला वेळ लागणार नाही. असा मौलिक सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पेट्रोल पंप मालकाला दिला आहे.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सृष्टी पेट्रोलियमच उद्घाटन पार पडलं यावेळी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, इंधन आजच्या काळातील मूलभूत गरजांपैकी एक गरज आहे.त्याच्या उपलब्धतेवर जगामध्ये वाहतूक दैनंदिन जीवन चालतं.मी सहसा संस्थांच्या पेट्रोल पंपांची उद्घाटन करत असतो कारण ती संस्था सर्वांची असते.पुणे सोलापूर महामार्ग हा रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे उद्या या पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी परवानाधारक वेपन लागलं तर त्याबाबतीत मदत केली जाईल.
पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचे काम करत असते परंतु चांगली सेवा देत असताना काळजी घेण्याचं काम सुधा व्यवसाय धारकाने करायचं असतं.ती तुमची आमची सर्वांची जबाबदारी असते.आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनात ठेवून सर्वांनी काम करायचं असतं. जातीय सलोखा ठेवायचा असतो तो प्रयत्न आपण सर्वजण मिळून करू.
ग्लोबल वॉर्मिंगचा संकट आहे.कालच आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला आहे.आपल्याला प्रदूषण कमी करायचा आहे.जुनी लोकं सांगतात की मे च्या तिसऱ्या आठवड्यात एवढा पाऊस पडलेला कधीही पहिला नाही. माझी आई 87 वर्षाची आहे,तिने सांगितलं की अजित मला जसं कळतंय तसं मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एवढा पाऊस पडलेला मी कधी पाहिला नाही.
बारामती दौंड इंदापूर ची वार्षिक सरासरी 14 इंचाची आहे, पण काही भागात एकाच दिवसात तेवढा पाऊस पडला. पिकाच्या नुकसानीचे घरात पाणी असेल अशा अनेक बाबींचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकारी वर्गांना दिल्या आहेत पंचनामे ही झालेले आहेत.साधारण दहा हजार रुपयाची मदत आपण दिलेली आहे धान्य मोफत देण्याचा प्रयत्न आपण केला आहे.बाकीचा निधी मंत्रालयातून प्रस्ताव आल्यानंतर ताबडतोब देण्याच्या सूचना या सरकारने दिलेले आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत होईल त्याबाबत कोणी शंका काढू नका.
What's Your Reaction?






