शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट ; मांडणार या समस्या
आय मिरर
जे प्रश्न मला लोकांनी मांडले त्याच्यावरती मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले आहे त्या पत्रामध्ये जानाई शिरसाई पुरंदर उपसा योजना या अत्यंत महत्त्वाचे आणि दुष्काळी गावाला न्याय देणाऱ्या योजना आहेत त्याला त्याला मान्यता देऊन फार वर्ष झाली.त्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे त्याची पोहोच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. मुख्यमंत्री ठरवतील त्या दिवशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्यासह ही बैठक मुंबईला लावावी अशी माझी विनंती आहे मी फोनवरून ही त्यांच्याशी बोलणार आहे.असं राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे.ते बारामतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्यानंतर या दौऱ्यात जे जे काही प्रश्न माझ्या कानावर आले ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडले जातील आणि त्यातून काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा हा प्रयत्न माझा आहे.असं पवार म्हणाले.
पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तसा दुधाचाही प्रश्न गंभीर आहे.दुधासाठी येणारा खर्च आणि सरकारकडून मिळालेली किंमत याचा मेळ बसत नाही. सरकारकडून पाच रुपये अनुदान जाहीर झालं मात्र अनेक लोक सांगतात की ही रक्कम आम्हाला मिळाली नाही. सरकारने दुधाची किंमत वाढवून द्यावी. दुधाचा धंदा पूर्वपदावर आणण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.
शिक्षण संस्थांच्या संदर्भातील स्थानिक लोकांच्या काही मागणी आहेत.त्या सोडवण्यासाठी सरकारशी बोलायची आवश्यकता नाही संस्थेचा अध्यक्ष मीच आहे.भोर पुरंदर बारामती इंदापूर भागातील लोकांची सुखदुःख जाणून घेण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की मी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाणार असं पवारांनी सांगितलेय.
एका मर्यादेच्या बाहेर ओबीसी आंदोलन जाऊ नये…
केंद्र सरकारने यात पुढाकार घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल काही ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारचा धोरण यात बदल करावा लागेल. या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मार्ग काढावा. सरकारने विशेषत: केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे.एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी.पण त्याचा सामाजिक परिणाम होणार नाही याची काळजी घेणं ही सर्वांची जबाबदारी आहे आम्ही येतो राजकारणावर आणू इच्छित नाही.
What's Your Reaction?