फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी सुप्रिया सुळेंना मतदान करा : राज राजापुरकर

आय मिरर
भिगवण (ता.इंदापूर) येथे बारामती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा भैरवनाथ मंदिरात श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी फुले शाहू आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी सुप्रिया सुळेंना मतदान करा असे आवाहन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांनी केले.
राजापुरकर म्हणाले की,पुरोगामी विचाराच्या शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर सर्वांना बरोबर घेऊन चालणारे महाराष्ट्राचे लोकनेते शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात येऊन आम्हाला सुळे नाही तर शरद पवार यांना संपवायचे आहे असे विधान काही दिवसापुर्वी भाजप नेत्याने केल्याने हा भाजपने आखलेला डाव सर्वसामान्य जनता कधी पुर्ण होऊ देणार नाही. याउलट जनतेचा स्वाभिमान जागृत होऊन सर्वसामान्य लोकांनी ही निवडणुक हाती घेतली आहे. यामुळे सर्व पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन शंभर टक्के मतदान होईल या पध्दतीने प्रचार यंञना राबवने महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच ही निवडणुक लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिने व अदृश्य शक्तीच्या मदतीने चाललेली दडपशाही वेळीच रोखण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे आहे असे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी बोलताना सांगितले.
यावेळी अनेक पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केली.
यावेळी अमोल देवकाते अध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे जिल्हा, बाळासाहेब चितळकर ऒबीसी सेल इंदापुर, दादासाहेब थोरात, आप्पासाहेब गायकवाड रमेश बाबा धवडे, राजु भिसे, केशव भापकर, शशिकांत काटे, लहु घोलप, हेमंत निबांळकर, किरण रायसोनी, अमोल बंडगर, अजिनाथ बंडगर किरण कांबळे, कपिल शिंदे, योगेश चव्हाण, अस्लम मुलाणी, पिंटु वाळके, दिपक शिंदे, कुडलिक धुमाळ, विजयकुमार गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






