इंदापूरात तेजपृथ्वी ग्रुप कडून होणार नवदुर्गांचा सन्मान
आय मिरर
पुरुषांबरोबर स्त्रिया ही सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत, आपली घरातील जबाबदारी पूर्ण पाडून चूल आणि मूल यापेक्षाही केल्यानंतर खूप काही करता येते हे स्त्रियांनी आपल्या कामाच्या स्वरूपातून नेहमीच दाखवून दिले आहे.अशा नवदुर्गांचा तेजपृथ्वी ग्रुप कडून सन्मान होणार आहे.
याबाबत तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात म्हणाल्या की,नेहमी शांत संयमी वाटणारी भगिनी जेव्हा आपल्या कुटुंबावर आपल्या समाजावर वेळ येते तेव्हा ती दुर्गेची भूमिका साकारून आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभी असते. अशाच प्रकारे सर्व गोष्टींचा विचार करून समाजात प्रशासकीय राजकीय सामाजिक शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रियांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आणि त्यांचा सन्मान करणे आद्य कर्तव्य म्हणून इंदापूर तालुका तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
राजेंद्र केसकर उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, रुक्मिणी गलांडे असिस्टंट कमिशनर पुणे,श्रीकांत पाटील तहसिलदार इंदापूर,दिलीप पवार पोलीस निरीक्षक इंदापूर,अनिल ठोंबरे नायब तहसीलदार इंदापूर,अँड.राहुल मखरे राष्ट्रीय सचिव, बीएमपी,मधुकर भरणे संचालक, कृ.उ.बा.समिती इंदापूर,पांडुरंग मारकड मा. उपसभापती कृ. उ. बा. इंदापूर,महेंद्र रेडके,रेश्मा घनश्याम हाके सामाजिक कार्यकर्त्या पुणे या प्रमुख मान्यवरांसह मिताली कोळी(बाळूमामा सिरिअल फेम) यांच्या उपस्थितीत इंदापूर पंचायत समिती सभागृहात 17 आँक्टोंबर ला संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.
आर. जी. साबळे, गणेश शिंगाडे, सद्दाम बागवान, विजय पवार लक्ष्मण वाघमोडे, तानाजी हेगडकर, संदीप रेडके, सुनंदा रणवरे, मालन निंबाळकर सुधीर पाडुळे, अर्चना गोरड, गोकुळ कोकरे, हनुमंत यमगर, रुपेश वाघमोडे यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार आहे.
What's Your Reaction?