विकास निधीच्या बाबत निमगावकरांना नेहमीच झुकतं माप - श्रीराज भरणे यांचे प्रतिपादन

Oct 13, 2023 - 11:36
 0  776
विकास निधीच्या बाबत निमगावकरांना नेहमीच झुकतं माप - श्रीराज भरणे यांचे प्रतिपादन

आय मिरर

दत्तामामांच्या राजकिय वाटचालीमध्ये निमगावकरांनी अडचणीच्या काळामध्ये मोलाची साथ दिली आहे.त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरणे मामा जेव्हा-जेव्हा निधी मंजूर करून आणतात,त्यामध्ये निमगाव केतकीला नेहमीच झुकते माप देत असल्याची माहिती श्रीराज भरणे यांनी दिली.

निमगाव केतकी ता.इंदापूर येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या काळेवस्ती येथील बंधाऱ्यातील पाणीपुजन श्रीराज भरणे यांच्या शुभहस्ते पार पडले,यावेळी ते बोलत होते.

या ठिकाणी दोन बंधाऱ्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुमारे ३२ लाख रूपये निधी मंजूर केला होता.या बंधाऱ्यामुळे आसपासच्या भागातील जवळपास १०० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.असं ही त्यांनी सांगितले.

श्रीराज भरणे यांनी म्हणाले कि,तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने माननीय भरणे मामांना आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे,त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता भरणे मामा इमाने-इतबारे तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या मदतीला कायम धाऊन जात असून कुणाचे दवाखान्याचे काम असो,कुणाचे शिक्षणाचे काम कसो,कुणाला कसलीही अडचण असो ये व्यक्तीश: नागरिकांच्या अडचणी सोडविण्यामध्ये दिवस-रात्र व्यस्त असतात.

तसेच विकासाच्या बाबतीत तर मामा कुठून कसा निधी आणतात याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही,परंतु इतर मतदार संघाच्या तुलनेत आपल्या तालुक्यातील विकासकामांसाठी करोडो रूपयांचा निधी मामांच्या प्रयत्नातून सहजासहजी मंजूर होत असतो,हे तालुकावासियांना माहित आहे.  

इतर तालुक्यामध्ये दहा-वीस लाख रूपयांचा निधी मिळवायचा म्हटलं तरी गावकऱ्यांना खूप पाठपुरावा करावा लागतो.मात्र इंदापूर तालुक्यामध्ये मामांच्या माध्यमातून चालता-बोलता कोटी-कोटी,दोन-दोन कोटी रूपये निधी मंजूर होत असल्यामुळे अलीकडच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांना दहा-वीस लाख रूपये म्हणजे अगदी किरकोळ रक्कम वाटत असल्याची मिश्कील टिप्पणीही श्रीराज भरणे यांनी केली.

यावेळी सरपंच प्रविण डोंगरे,उपसरपंच मधुकर भोसले,संदीप भोंग,ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापूरे,सागर मिसाळ,अजित मिसाळ,संतोष जगताप,माणिक भोंग,कमल राऊत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow