जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये एल.जी.बनसुडे विद्यालयाचे घवघवीत यश

Oct 13, 2023 - 09:29
Oct 13, 2023 - 09:30
 0  416
जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये एल.जी.बनसुडे विद्यालयाचे घवघवीत यश

आय मिरर

पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक सेवा संचालय व क्रीडा अधिकारी व क्रीडा शिक्षक संघटना पुणे यांच्या अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये एल जी बनसुडे विद्यालयातील १७ वर्षे वयोगटामध्ये मुलींच्या संघाने दौंड या संघाचा १७ गुणांनी पराभव करत प्रथम क्रमांक मिळविला. 

तसेच १९ वर्षे वयोगट मुलांच्या संघाने दौंड संघाचा ७ गुणांनी पराभव करत प्रथम क्रमांक मिळवला व या दोन्ही संघांची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी मिळवल्याबद्दल सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक सागर बनसुडे व रुपेश भालेराव यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे , उपाध्यक्ष डॉ. शितल कुमार, कार्याध्यक्षा सौ. नंदा बनसुडे, सचिव नितीन बनसुडे , प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, विभाग प्रमुख प्रविण मदने, ज्योती मारकड तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे विश्वस्त यांनी हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow