पवारांच्या व्यासपीठावर हर्षवर्धन पाटलांची एन्ट्री , इंदापूरच्या राजकारणात खळबळ

Oct 23, 2023 - 15:11
 0  943
पवारांच्या व्यासपीठावर हर्षवर्धन पाटलांची एन्ट्री , इंदापूरच्या राजकारणात खळबळ

आय मिरर

राज्याचे माजी मंत्री व भाजप जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील गेल्या दहा वर्षात सत्तेतून दूर आहेत तरीही राज्याच्या राजकारणात ते चर्चेत असतात. भिगवण नजीक स्वामी चिंचोलीत पार पडलेल्या पवार कुटुंबीयांच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यात हर्षवर्धन पाटलांनी एन्ट्री करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत इंदापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

शरद पवार आणि अजित पवारांनी 2014 आणि 2019 च्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना ताकद दिली आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला. तेव्हापासून हर्षवर्धन पाटील सत्तेत नाहीत. 2019 ला तर तिकीट वाटपाच्या घोळावरून हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपची वाट धरली होती. 

मात्र गेल्या काही दिवसात अजित पवारांच्या सरकारमध्ये झालेल्या एन्ट्री ने हर्षवर्धन पाटलांची पुन्हा गोची होतेय की काय अशा चर्चा इंदापूरच्या राजकारणात रंगल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक गट घेऊन अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आणि इंदापूर मधून आमदार दत्तात्रय भरणे यांनी ही अजित पवारांना समर्थन जाहिर केलं. त्यामुळे ज्या दत्तात्रय भरणे यांच्या तिकिटावरूनच 2019 ला इंदापूरच्या राजकारणात रणकंदन माजलं त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या विधानसभेला होते की काय या चर्चा जोर धरु लागल्या. तोच दुसरीकडे जे जे आमदार अजित पवार गटामध्ये गेले आहेत. त्यांच्या मतदारसंघात खुद्द शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष घालण्यास सुरवात केली. राष्ट्रवादी मधील घडामोडीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच महिन्यात इंदापूर तालुक्याचे जवळपास तीन ते चार दौरे करत पक्षाची बांधणी पुन्हा सुरु केली. अशातचं स्वामी चिंचोलीत पार पडलेल्या पवार कुटुंबियांच्या सोहळ्यात थेट भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कार्यक्रम पत्रिकेत नाव नसताना देखील कार्यक्रमाला बोलवून पवारांनी अनोखा इशाराच दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow