पुरंदर हवेलीतून संभाजी झेंडे निवडणूक लढवण्यावर ठाम ! तर संजय जगताप म्हणतात…

Sep 21, 2024 - 13:37
Sep 21, 2024 - 13:41
 0  106
पुरंदर हवेलीतून संभाजी झेंडे निवडणूक लढवण्यावर ठाम ! तर संजय जगताप म्हणतात…

आय मिरर

पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडीमध्ये आता वादाची ठिणगी पडल्याच्या समोर येतेय... महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुरंदरची जागा ही काँग्रेसच्या वाटेला जाईल अशी चिन्ह असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव झेंडे यांनी या ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. संभाजीराव झेंडे यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांवरती टीका टिप्पणी ही केली आणि या टिकेला आता पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि पुरंदर हवेली चे विद्यमान काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी सोशल मीडियातून उत्तर दिले आहे.

संभाजी झेंडे यांनी 2009 ची आठवण करून देत माझ्या पक्ष शिस्तीबद्दल आणि पक्षाबद्दल असणाऱ्या निष्ठेबद्दल उल्लेख केला. महाविकास आघाडीत असणाऱ्या माझ्या योगदानाबद्दल उल्लेख केला हे अतिशय दुर्दैवी आहे. संभाजी झेंडे यांना निवडणूक लढवायची आहे तर त्यांनी आतापर्यंत वयाच्या साठी पर्यंत काय केलं आणि काय करणार आहात हे मांडावं. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट दाखवता ते विचार बोट तुमच्या स्वतःकडे असतात. माझ्या पक्षनिष्ठेबद्दल आपल्याला बोलायचा अधिकार नाही. मी जन्मापासूनच काँग्रेसी आहे आणि राहणार असे खडे बोल संजय जगताप यांनी सुनावले आहेत.

पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघांमध्ये काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत.आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस पक्षाला सुटेल अशी शक्यता आहे.असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी पुरंदर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. पत्रकार परिषदेत संभाजी झेंडे यांनी संजय जगताप यांच्या वरती विविध आरोप केले होते.

यानंतर पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि पुरंदर हवेली चे विद्यमान आमदार संजय जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजी झेंडे यांना प्रतित्तर दिले आहे.

काय म्हणाले होते संभाजीराव झेंडे…

आघाडी पाळायची की नाही याचे उदाहरण विद्यमान आमदार संजय जगताप यांनीच आम्हाला 2009 ला घालून दिलं आहे. दिगंबर दुर्गाडे हे आघाडीचा उमेदवार असताना संजय जगताप यांनी बंडखोरी केली त्यावेळी पक्षाचे मोठं नुकसान झालं मात्र पवार साहेबांनी मोठं मन दाखवून जगतापांना 2019 ला उमेदवारी दिली होती मी थांबलो होतो मात्र आता माझी थांबण्याची तयारी नाही मी निवडणूक लढवायची हे ठरवलेलं आहे असं संभाजी झेंडे यांनी म्हटले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow