लग्नाच्या कपड्यातच नवरीची समुद्रात उडी; पण मस्करी करणं पडलं होतं महागात

Dec 18, 2023 - 16:53
Dec 18, 2023 - 16:54
 0  1006
लग्नाच्या कपड्यातच नवरीची समुद्रात उडी; पण मस्करी करणं पडलं होतं महागात

आय मिरर

सध्या लग्नाचा सीजन आहे, ज्यामुळे सोशल मीडिया ओपन केलं तरी सर्वात जास्त लग्नाचेच व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही मनोरंजक क्षणांचे असतात. तर कधी एखाद्या विचित्र घटनेचे.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/reel/C03bPyfh0rK/?igshid=MzRlODBiNWFlZA==

आपल्या लग्नाचा दिवस सगळ्यांच्या लक्षात रहावा असं प्रत्येक नववधू आणि नवरदेवाला वाटत असतं. त्यामुळे ते असं काहीतरी करतात ज्याबद्दल चर्चा होईल. बाहेरगावी तर काही लोक मज्जा मस्करीसाठी वाटेलच्या थराला जातात. असंच काहीसं एका कपलनं करायचं ठरवलं.

या कपलनं एका बोटीवर लग्न केलं आणि मग लग्ननंतर समुद्रात उडी मारण्याचा विचार केला. नवरदेव आधीच पाण्यात उतरला होता आणि तो नववधूला पाण्यात उडी मारण्यासाठी प्रोत्साहित करत होता. तेव्हा त्याचा मित्र परिवार हे सगळं आपल्या फोनमध्ये कैद करण्यासाठी तयार होते.

नववधूने आपल्या गाउनसह उडी मारली खरी पण पुढे तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला ज्याचा विचार कोणीच केला नाही.खरंतर नववधूने पाण्यात उडी घेताच तिच्या गाउनचा घेर तिच्या डोक्यावर आला आणि त्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला. नववधूला यामुळे वर येता नव्हतं आणि श्वासही घेता येत नव्हतं. नववधूची अशी अवस्था पाहून नवरदेव लगेच तिच्या मदतीसाठी धावला पण त्याचा काही फायदा झाला नाही.

अखेर नववधूच्या मदतीला आणखी एक महिला आली, सोबतच आणखी काही लोक तिच्या मदतीला आले. ज्यानंतर कसंबसं करत नववधूला श्वास घेणं शक्य झालं. नववधूला अशा पद्धतीनं मस्करी करणं खरंच महागात पडलं होतं आणि नंतर तिला हे कळूच चुकलं की तिची फारमोठी चुक झाली आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर sachkadwahai नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. या व्हिडीओवर भरभरुन कमेंट करण्यात आले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow