राज्यातील ग्रामपंचायती 3 दिवस राहणार बंद; या मागण्यांसाठी सरपंचासह कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Dec 18, 2023 - 16:20
 0  398
राज्यातील ग्रामपंचायती 3 दिवस राहणार बंद; या मागण्यांसाठी सरपंचासह कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आय मिरर

ग्रामपंचायत सरपंच यांचे मानधनासह, ग्रामपंचायत कर्मचारी,संगणक परिचालक यांच्या प्रश्नांना संदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या राज्यभरातील सर्व संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत या आज १८, १९ आणि २० डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येवून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ग्रामपंचायत सदस्य भत्ता, सरपंच उपसरपंच थकीत मानधन अदा करावीत, मानधनात भरीव वाढ व्हावी, मानधनाची शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावी, विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे, नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दर्जा देऊन वेतन देण्यात यावे, यासह संगणक परिचलकांच्या मागण्यासाठी राज्यातील सर्वच ग्रामपंचायती तीन दिवस बंद पाळणार आहेत.

राज्यव्यापी संपात अखिल भारतीय सरपंच परिषद , महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी कामगार या बरोबरच गावगाडा हाकणाऱ्या सर्वच संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तीन दिवस बंद नंतरही मागण्या मान्य झाल्या नाही तर जानेवारी महिन्यात राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच सदस्य लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow