सरडेवाडीत झालेल्या चोरीचा तपास 12 तासांच्या आत लावण्यात इंदापूर पोलिसांना यश

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या चोरीचा तपास 12 तासांच्या आत करीत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याची कौतुकास्पद कामगिरी इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केले असून चोरीस गेलेला संपूर्ण 8 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.याप्रकरणी एका विधी संघर्ष बालकाला (अल्पवयीन) अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापुर पोलीस स्टेशनमध्ये मंगळवार (ता.27) रोजी जाधवपाटी सरडेवाडी ता. इंदापुर जि.पुणे येथे फिर्यादी निलेश नामदेव चित्राव याचे राहते घरामधुन कोणीतरी अज्ञात इसमाने दागिने आणि रोख रक्कम चोरून नेलेची फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हाचे गांभीर्य ओळखुन लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी गुन्हेशोध पथकास व गुन्हाचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांनी गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शक सुचना दिल्या.त्यानुरूप गुन्हेशोध पथकाने गोपनीय बातमीदार याद्धारे माहीती प्राप्त करून आरोपीचे नाव निष्पन्न केले व सदर आरोपीस ताब्यात घेतले त्यावेळी तो विधीसंघर्षशीत बालक असल्याचे समोर आले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हाची कबुली दिली. व त्याचे कडुन चोरी केलेले 13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 8 लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार सहायक फौजदार प्रकाश माने, पोलिस नाईक सलमान खान, विष्णु केमदारणे, पोलिस शिपाई नंदु जाधव, विशाल चौधर, गणेश डेरे, लक्ष्मण सुर्यवंशी, महिला पोलिस हवालदार शुभांगी खंडागळे व होमगार्ड लखन झगडे यांनी केली.
What's Your Reaction?






