चिकन शोरमा देण्यास नकार दिल्याने त्याने थेट व्यावसायिकाच्या डोक्यातचं चाकूने वार केले,धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं

Jan 3, 2024 - 21:57
Jan 3, 2024 - 21:59
 0  334
चिकन शोरमा देण्यास नकार दिल्याने त्याने थेट व्यावसायिकाच्या डोक्यातचं चाकूने वार केले,धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं

आय मिरर

पुणे शहरात विचित्र घटना घडली आहे.चिकन शोरमा रोल देण्यास नकार दिल्याने ग्राहकाने थेट दुकानदाराच्या डोक्यात चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.ही घटना कोंढव्यातील मिठानगर परिसरात घडली असून या हल्ल्यात चिकन शोरमा व्यावसायिक जखमी झाला आहे. या प्रकरणी अब्दुल्ला हाशीम शेख (वय २३, रा.भाग्योदयनगर, कोंढवा) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुफियान अय्युब शेख (वय २४, रा. मिठानगर, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला शेख याचे आयेशा चिकन शोरमा दुकान असून, सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो दुकान बंद करीत होता. त्यावेळी सुफियान खानने खाण्यासाठी चिकन शोरमा रोल मागितला.

परंतु अब्दुल्लाने त्याला दुकान बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे सुफियानने रागाच्या भरात अब्दुल्लाला मारहाण केली. त्यानंतर सुफियानने तेथील चाकूने डोक्यात वार केला. या हल्ल्यात अब्दुल्ला जखमी झाला असून, त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow