धक्कादायक ! इराकमध्ये लग्नसमारंभावेळी हॉलमध्ये अग्नितांडव, 100 जणांचा मृत्यू तर 150 जण जखमी

Sep 27, 2023 - 07:39
Sep 27, 2023 - 07:41
 0  376
धक्कादायक ! इराकमध्ये लग्नसमारंभावेळी हॉलमध्ये अग्नितांडव, 100 जणांचा मृत्यू तर 150 जण जखमी

आय मिरर

लग्नसमारंभावेळी मंडपात आग लागून इराकमध्ये भीषण दुर्घटना घडली. या घटनेत किमान १०० जणांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. इराकच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती आहे. ही आग लग्नानंतर जल्लोष करताना केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागल्याचं सांगण्यात येतंय. उत्तर पूर्व क्षेत्रात एका मोठ्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये ही आग लागली.

प्राथमिक माहितीनुसार इमारतीसाठी वापरण्यात आलेले साहित्य हे ज्वलनशील असल्याचं म्हटलं जातंय. यामुळे आग वेगाने पसरली आणि रौद्ररुप धारण केलं. याबाबत आलेल्या प्राथमिक अहवालानुसार लग्नसमारंभावेळी आतषबाजी करत असतानाच आगीचा भडका उडाला. राजधानी बगदादपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या मोसूल शहरापासून जवळच हा हॉल होता.

अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णवाहिका, ड़ॉक्टर्स आणि बचावदलाचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. घटनास्थळी असलेल्यांनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. लग्नसमारंभासाठी मोठ्या प्रमाणावर लोक आले होते. अचानक घडलेल्या या घटनेने मोठा गोंधळही उडाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow