इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते "आनंदाचा शिधा"चं वितरण
आय मिरर
गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने रेशन कार्डधारकांना खास भेट म्हणून शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने आज इंदापूर शहरात राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आनंदाच्या शिधा किटचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने सामान्य जनतेची अडचण विचारात घेऊन सणाचा आनंद घेता यावा यासाठी अल्प दरात आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानातून शंभर रुपयांमध्ये चार वस्तू देण्याची व्यवस्था केली आहे.यामुळे नागरिकांना गौरी-गणपती सण आनंदात साजरा करता आल्याचं भाजपा नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या किट चे राज्यभर वाटप करण्यात येत आहे.या किटमध्ये शंभर रुपयात एक किलो रवा, चणाडाळ ,साखर आणि एक लिटर खाद्यतेल आहे. राज्यातील १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिदा धारकांना या योजनेचा लाभ होत आहे.
या वेळी इंदापूर भाजप अध्यक्ष शकीलभाई सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मेघश्याम पाटील,गट नेते कैलास कदम, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक स्वप्नील सावंत,बबन शेटे- पाटील,अविनाश कोतमिरे,दादा पिसे, सागर गानबोटे, गोपीचंद गलांडे,हमिद अत्तार उपस्थित होते.
What's Your Reaction?