धक्कादायक ! केवळ ६० रुपयांसाठी मित्रचं बनला मित्राचा वैरी
आय मिरर
गोंदिया जिल्हा एका खुनाच्या घटनेनेचे हादरले आहे. केवळ ६० रुपयांसाठी मित्र मित्राचा वैरी बनला असून या वादावरून मित्राची गळा दाबून हत्या करण्यात आली. ही घटना दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम बोदा येथे रविवारी घडली. हे दोघे पैशाच्या देवाणघेवाणी बाबत चर्चा करत होते. मात्र याच कारणावरुन वाद झाला आणि ६० रुपयांवरून एकमत होऊ न शकल्याने खून करण्यात आला.
अल्पेश कुवरलाल पटेल असे आरोपीचे नाव आहे. तर याने आकाश लक्ष्मण दानवे (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पेशकडून मृत आकाशने काही दिवसांपूर्वी ६० रुपये उसने घेतले होते. हे पैसे अल्पेशने आकाशला परत मागितले. यानंतर आकाशने हे पैसे फोन पे द्वारे रात्री पाठवतो असे, सांगितले. मात्र, अल्पेशला यावर विश्वास बसला नाही.
त्याने तातडीने त्याला पैसे परत मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले. यात आरोपी अल्पेशने आकाशचा जोरदार गळा आवळला. यात आकाश बेशुद्ध होऊन खाली कोसळला. आकाशला तातडीने वनीवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच आकाशला मृत घोषित केलं. आकाशच्या मृतदेहांचे शव विच्छेदन उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे करण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दवनीवाडा पोलिसांनी आरोपी अल्पेशला अटक केली आहे.
What's Your Reaction?