तिची गळा दाबून हत्या केली, नंतर मृतदेह शौच्छालयाच्या टाकीत टाकला हे सर्व एका निलंबित पोलिसानं केलं 

Dec 11, 2024 - 15:13
 0  782
तिची गळा दाबून हत्या केली, नंतर मृतदेह शौच्छालयाच्या टाकीत टाकला हे सर्व एका निलंबित पोलिसानं केलं 

आय मिरर

त्यांची बालपणीची मैत्री तरुणपणी ही टिकून होती.तिला स्वतःपेक्षा अधिक त्याच्यावर विश्वास होता,पण अखेर त्यानेच घात केला.अगोदर त्याने तिची हत्या केली नंतर तीचा मृतदेह निर्जनस्थळी असलेल्या शौचालयाच्या टाकीमध्ये टाकला.हे सर्व हरिश्चंद्रवेळ्यात घडलयं.यामुळे एकचं खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील महिला बेपत्ता होती.काही दिवसांपासून ती बेपत्ता असल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला.अखेर ही बेपत्ता महिला सापडली पण थेट मृतावस्थेतचं.

अरुणा काकडे वय 37 वर्षे असं या मृत महिलेचे नाव असून ती चिमूर शहरातील रहिवाशी होती. याप्रकरणी पोलिसांनी निलंबित पोलीस नरेश डाहुले याला अटक केली आहे.नरेश डाहुले हा पोलिस चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतून निलंबित झाला होता. 

अरुणा काकडे ही या निलंबित पोलिसाची वर्गमैत्रिणी होती.नरेश आणि अरुणा बालपणीचे मित्र होते.मात्र नागपूर शहराजवळील हरिश्चंद्रवेळा गावाजवळ निर्जनस्थळी अरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिमूर येथे ही महिला देवांश जनरल स्टोअर्स नामक दुकान चालवत होती. 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी ती गेली होती. पण त्यानंतर ती परतलीच नाही. यामुळे कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

तक्रारीच्या अनुषंगाने नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला. यात निलंबत पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याने अरुणाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. 

26 तारखेला मृत महिला अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणाचा गळा दाबून हत्या केली. 

नरेश डाहुलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश असल्याने त्याला वर्षभरापूर्वी निलंबित केले गेले होते.पण कॉल रेकॉर्डच्या मदतीने पोलिस आरोपी पर्यंत पोहचण्यात यशस्वी झाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow