Crime News : प्रेमसंबंधातून त्याने तिच्या कानावर कोयत्याने वार केला, जबड्यापर्यंत गेला

आय मिरर
साताऱ्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबधातून एका महिलेवर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोयत्याने केलेला वार तिच्या कानापासून जबड्यापर्यंत गेला आहे.
या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तीच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडमधील मलकापूर आगाशिवनगर येथील दांगट वस्तीत दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र सुभाष पवार (वय- ३५, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर) असं हल्लेखोराचे नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबाबत कराड शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोर पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आगाशिवनगर येथील एका महिलेचा विवाह झाला असून नवऱ्यासोबत झालेल्या वादामुळे ती महिला आई-वडिलांकडे राहते. तीला तीन आपत्य आहेत. ही महिलेचा रवींद्र याच्याशी पुर्वीचाच परिचय आहे. या परिचयातून त्यांची ओळख वाढून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गुरूवारी दुपारी रवींद्र तिच्या घरी गेला होता. त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं. त्यानंतर रवींद्रने महिलेवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याने केलेला वार तिच्या कानापासून जबड्यापर्यंत गेला आहे.
त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कृष्णा रूग्णालयात दाखल केलं. तिच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हल्ला केल्यानंतर रवींद्र पवार घटनास्थळावरून पळून गेला आहे. त्याचा शोध पोलिसांची तीन पथकं घेत आहेत. पीडित महिलेच्या वडिलांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरिक्षक राजू ताशीलदार यांनी भेट देवून घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळचा पंचनामाही केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
What's Your Reaction?






