वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धनाचा प्रवास झाला सुरु,आ.भरणेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली स्थळ पाहणीसह बैठक
आय मिरर
इंदापूर शहरातील ऐतिहासिक वीरश्री मालोजीराजे भोसले गढी व हजरत चाँद शाहवली बाबा दर्गाह यांचा सर्वसमावेशक असा विकास आराखडा करावा जेणे करून भविष्यात हा इतिहास नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल अशी सूचना राज्याचे माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरातील ऐतिहासिक वीरश्री मालोजीराजे गढी व हजरत चाँदशहवली बाबा दर्गाह यांचा जिल्हा नियोजन समिती पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या संवर्धनसाठी विकास आराखडा तयार करणेबाबत राज्याचे माजीमंत्री आ.दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थळ पाहणी व विशेष बैठक संपन्न झाली.यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्याधिकारी रामराजे कापरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दीपक भोसले, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, प्रकल्प सल्लागार स्मिता तावरे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक रवींद्र पिसे, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, प्रा.कृष्णा ताटे, भारत जामदार, वसंतराव मालुंजकर, श्रीधर बाब्रस, गफुर सय्यद, सतीश जाधव, महादेव सोमवंशी, रवींद्र जामदार, गणेश रणदिवे, ॲड.आशुतोष भोसले, आझाद पठाण, अनिल चव्हाण, बाळासाहेब ढवळे, अमर गाडे, अशोक मखरे, बाळासाहेब व्यवहारे, राजेश शिंदे,राहुल गुंडेकर, अहमदरजा सय्यद, हमीद आतार, महादेव चव्हाण यांचेसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.भरणे म्हणाले, या ऐतिहासिक वास्तूचा संवर्धनाचा प्रश्न सर्वप्रथम आमदार या नात्याने विधानसभेत मांडला.त्यावर संबंधित खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आश्र्वासित केले.मात्र त्यानंतर मंत्री खाते बदल झाला. मात्र पर्यटन विभागाला निधीची अडचण असते हे ओळखून कामाला प्राधान्य देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सदर काम नियोजन विभागाकडे वर्ग करण्याची मागणी केली. त्यांस यश मिळाले.यामुळे आता निधीची कमतरता असणार नाही तसेच काम वेगाने पुढे नेण्यास मदत होणार आहे.यामुळे विकास आराखडा तयार करताना सदर परिसराची ऐतिहासिक गुण वैशिष्टे अबाधित राहतील अशा रितीने प्रस्ताव तयार करण्याबाबत सांगितले.
What's Your Reaction?