धावत्या दुचाकीवर त्यांचे फोटो सेशन सुरू असतानाच सालेबर्डी पुलावर नेमकं काय घडलं

Dec 24, 2023 - 07:25
Dec 24, 2023 - 07:31
 0  604
धावत्या दुचाकीवर त्यांचे फोटो सेशन सुरू असतानाच सालेबर्डी पुलावर नेमकं काय घडलं

आय मिरर

तीन युवक दुचाकीने भंडाऱ्यावरून कोरंभीमार्गे जवाहरनगरकडे येत होते. वाटेतील सालेबर्डी पुलावर सेल्फीच्या नादात भरधाव दुचाकीने पुलाला धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर, सोबत असलेले दोघे गंभीर जखमी झाले आहेत.मृताचे नाव मृणाला मेश्राम (वय १९) असे असून, तिघेही तुमसर तालुक्यातील रोहा सुकळी येथील रहिवासी आहेत.

राेहा-सुकळी येथे तिघे युवक आज, शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीने भंडारावरून कोरंभी मार्गे जवाहरनगरकडे जात होते. या भागातील बॅकवॉटर व मधातच दिसणारी झुडपे यामुळे त्यांनी धावत्या दुचाकीवरच सेल्फी काढणे सुरू केले. धावत्या दुचाकीवर त्यांचे फोटो सेशन सुरू असतानाच भरधाव वेगातील दुचाकी (क्रमांक एमएच ३६/ एसी ९९७६) अनियंत्रित झाली. त्यामुळे दुचाकीने साहुली-जवाहरनगर मार्गावरील पुलाला जोरदार धडक दिली.

या अपघातात जबर जखमी झाल्याने मृणाल मेश्राम (वय १९) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच सोबत असलेले आयुष शहारे (वय १७) आणि पियूष गजभिये (वय १७ रा. सुकळी, ता. तुमसर) हे दोघे गंभीर जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू आहेत.

हे मित्र कोरंभी मार्गे सालेबर्डी - साहुली कडून जवाहरनगर कडे भ्रमंती करत होते, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेची जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात हवालदार सतदेवे तपास करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow