काय पाप केलतं भांडगांवकरांनी झुकतं माप टाकलं नाही,उद्याच्या निवडणूकीत ही चूक नको ! आ.भरणेंची भावणिक साद 

Dec 25, 2023 - 07:30
 0  607
काय पाप केलतं भांडगांवकरांनी झुकतं माप टाकलं नाही,उद्याच्या निवडणूकीत ही चूक नको ! आ.भरणेंची भावणिक साद 

आय मिरर

माझं काय चुकलयं ? भांडगांवकरांचं मी काय पाप केलतं? भांडगांवकरांची सेवा करण्यात मी कुठे कमी पडलो? माणूसकीत कमी पडलो की काम करण्यात कमी पडलो? की कोणाला मी बोलण्यातून दुखावले ? का या भांडगांवने माझ्या पदरात मतांच झुकतं माप टाकलं नाही असा सवाल करीत निवडणुका आल्यापुरतं नातीगोती पाहणारे आणि जातीपातीचे विष पसरवणाऱ्यांपासून सावध राहा ! येणाऱ्या निवडणुकीत अशी चूक करु नका म्हणतं आमदार दत्तात्रय भरणेंनी भांडगांव ग्रामस्थांना भावणिक साद घातली आहे.

इंदापूर तालुक्यातील भांडगांव येथे रविवारी दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी जाहिर सभेत ते बोलत होते.

भरणे म्हणाले की,भांडगाव ने माझ्यावरती दुर्लक्ष केलं, इतकं दुर्लक्ष करू नका ! २०१९ च्या विधानसभेला विरोधी उमेदवाराला ५४३ मताचे मताधिक्य दिले,म्हसोबा देवा भांडगाव मधील लोकांना बुद्धी दे ! निवडणूका आल्या की काही माणसे पावणा रावळा पाहतात. जातीपातीचे विष पेरतात, त्याला भांडगांवकर बळी पडतात.त्यामुळे काम करणाऱ्या माणसांना दुःख होतं.असं म्हणतं भरणे यांनी नांव न घेता भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांवर टीका केली.

भरणे पुढे म्हणाले, निवडणुकांपूरती येणारी लोक यापूर्वी का आली नाहीत.तुमच्या समस्या त्यांनी का जाणून घेतल्या नाहीत.दळणवळणाचे प्रश्न का सोडवले नाहीत. मी कामे करून देखील तुम्ही मतारुपी आशिर्वाद देत नाहीत.आम्हाला पण भावना आहेत असं करू नका.यापुढे असं घडलं तर एकमेकावरचा विश्वास उडेल.गावातील राजकारण गावात सोडा, आम्ही लक्ष देत नाही, परंतु विधानसभेला अशी चूक पुन्हा करू नका म्हणत आमदार भरणे यांनी भांडगाव ग्रामस्थांना साद घातली आहे.

आमदार भरणेंची एक कोटी 80 लाखांची घोषणा…

दरम्यान आमदार भरणे यांनी जाहिर सभेत भांडगांव येथील जनसेवा संघटनेने केलेल्या मागणीनुसार स्वामी विवेकानंद वाचनालयाकरीता १० लक्ष, तालीम संरक्षण भिंत बांधण्याकरीता १० लक्ष, पांडुरंग मंदीर दुरुस्ती करीता १० लक्ष, कुठला भांडगाव ते शेटफळ पाटी उर्वरित रस्ता करिता दीड कोटी रुपये असा एकूण एक कोटी 80 लाख रुपये निधी तात्काळ दिला जाईल याची सभेतचं घोषणा केली.यास ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,बाळासाहेब करगळ,भांडगावचे सरपंच पांडुरंग जाधव,उपसरपंच देविदास माने, यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन निलेश धापटे पाटील यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow