15 दिवसांपूर्वीच तिघांचा मृत्यू, घटना ताजी असतानाचं आणखी चौघे दगावले ! तो महामार्ग बनतोय का मृत्यूचा सापळा

आय मिरर
पुणे-नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 15 दिवसांपूर्वीच पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकला जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नाशिक पुणे महामार्गावर अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. माल वाहतूक ट्रक कारवर कोसळला कार त्याखाली दबली गेली. या घटनेत अकोले तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की क्रेनने कार तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांह रांगा उभ्या राहिल्या आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला.
पंधरा दिवसापूर्वी सटाणा तालुक्यातील सायखेडा येथून पुण्याकडे निघालेल्या जीपने पहाटे पाचच्या सुमारास ट्रकला मागून धडक दिली. दाट धुक्यामुळे जीपचालकाला अंदाज आला नाही. जीप चालक पंकज खंडु जगताप (वय 36), मधुकर तुकाराम अहिरे (वय 52), शांताराम संभाजी अहिरे (वय ५० सर्व रा. सायखेडा, ता. सटाणा, जि. नाशिकः) यांचा मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले होते.
What's Your Reaction?






