धक्कादायक ! पाच वर्षाच्या चिमुकल्याला इनोव्हाने चिरडले 

Feb 7, 2025 - 07:49
 0  437
धक्कादायक ! पाच वर्षाच्या चिमुकल्याला इनोव्हाने चिरडले 

आय मिरर

पाच वर्षाच्या चिमुकल्याला इनोव्हा कारने चिरडल्याची धक्कादायक घटना नाशिक मध्ये घडली आहे.ध्रुव अजित राजपूत वय ५ वर्ष अस मयत चिमुरड्याच नाव आहे.नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेल मध्ये हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार,मयत चिमुरड्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा सोबत हॉटेल मध्ये मुलांना खेळण्याठी घेऊन आले होते. मात्र खेळून झाल्या नंतर घराकडे जात असताना ध्रुव वडिलांचा हात सोडून लॉबी मध्ये जाताच ईनोव्हा गाडीने त्याला चिरडल्याने त्याचा यात मृत्यू झाल्याचं समोर आले.

ज्या गाडीने या चिमुरड्याला चिरडले तो दारू पिलेला होता असा अशी तक्रार मयत मुलाच्या वडिलांनी पोलिसात केली आहे त्यानुसार नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या इनोव्ह गाडीने उडवले त्या गाडीचा चालक या मुलाला हॉस्पिटल मद्ये सोडून पाळाल्याचा आरोप केला जातोय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow