मुंबईच्या समुद्रात भयानक घटना, सुसाट बोट प्रवाशी बोटीला धडकली,तिघांचा मृत्यू
आय मिरर
मुंबईच्या समुद्रात पहिल्यांदाच अशी भयानक घटना घडली आहे. गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट समुद्रात बुडाली असल्याची माहिती समोर आली आहे. पण आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.
एक स्पीड बोट सुसाट वेगात या बोटीला धडकली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुसाट वेगात असलेली ही बोट नीलकमल बोटीला बुडाली. या धडकेनंतरही नीलकमल बोट समुद्रात बुडाली. या घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाच्या फेरीबोटीला उरण कारंजा इथं हा अपघात झाला आहे. एक सुसाट वेगाने जाणारी खासगी स्पीड बोट या नीलकमल बोटीला धडकली. या बोटीमध्ये ७० ते ८० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील 77 प्रवाशांना रेस्क्यु करण्यात आलं आहे.
सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत आणि बचाव कार्य चालू आहे.
What's Your Reaction?