वन खात्याची परीक्षा देऊन घरी परतत होते दोन भाऊ एक बहीण तेवढ्यात डंपर आला…

Feb 9, 2024 - 06:59
 0  830
वन खात्याची परीक्षा देऊन घरी परतत होते दोन भाऊ एक बहीण तेवढ्यात डंपर आला…

आय मिरर

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हायवा ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वारांना चिरडलं. या अपघातात परीक्षेला जाणारे तिघे बहिण-भाऊ जागीच ठार झाले. तिन्ही भाऊ बहिणीच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. हा भीषण अपघात बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला.मृत तिघेही बहीण-भाऊ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी आहेत.

प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. तिघेही वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. त्यांच्याजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

वनविभागाची परीक्षा देऊन अंभोरे भावंडे राहत्या रूमकडे निघाले होते. मात्र भरधाव असलेल्या हायवाने तिन्ही भावंडांच्या बाईकला चिरडले. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. बीड बायपासवरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेल समोर गुरुवारी सकाळी 9.45 च्या सुमारास ही घटना घडली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow