इंदापुरात 5 हजार 281 पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी - क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Feb 8, 2025 - 07:44
Feb 8, 2025 - 07:47
 0  466
इंदापुरात 5 हजार 281 पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी - क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

आय मिरर

पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत इंदापूर तालुक्यात 5 हजार 281 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्यांचे पक्क्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती इंदापूरचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात यावर्षी 38 हजार 827 घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून 32 हजार 118 विक्रमी घरकुलांना मंजुरी दिली आहे यात इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 4 हजार 608 घरकुलांचा समावेश आहे.

या वर्षात पहिल्या टप्प्यात 1 हजार 88 घरकुल मंजूर आहेत त्यापैकी 741 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केलेला आहे. तसेच पहिला व दुसरा टप्पा मिळून इंदापूर तालुक्यात 5 हजार 275 घरकुलांना आज अखेर मंजूरी मिळालेली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2024-25 अंतर्गत इंदापूर तालुक्याला 5723 घरकुलांचे उद्दिष्ट आमदार श्री भरणे यांच्या माध्यमातून मिळाले होते. त्यापैकी श्री भरणे यांच्या माध्यमातून 5281 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर आधार कार्ड व तांत्रिक अडचणी संदर्भातील 442 घरकुलांना मंजुरी देणे अजूनही प्रलंबित आहे त्यातील पहिल्या हप्त्यात 741 लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. तर 4540 लाभार्थ्यांना हप्ता वितरित करणे बाकी आहे.

तसेच फेज दोनच्या पहिल्या टप्प्यात 1115 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यापैकी 1088 घर मंजुरी देण्यात आलेले आहे त्यापैकी 741 लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.

तर दुसऱ्या टप्प्यात 4608 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आली होती. त्यापैकी 4193 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आधार व तांत्रिक अडचणीची संबंधित 415 घरकुलांना मंजुरी देणे प्रलंबित आहे.

तसेच इंदापूर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत प्रामुख्याने आधार कार्ड दिलेले नाही अशा नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या मंजुऱ्या प्रलंबित आहेत. त्या प्रस्ताव सादर केलेल्या नागरिकांनी आधार कार्ड बँकेला संलग्न करावीत. स्वतःची जागा उपलब्ध असल्याची कागदपत्रे ग्रामपंचायत किवा पंचायत समितीमध्ये द्यावीत. त्यानंतर तालुक्यातील उर्वरित लाभार्थ्यांच्या घरकुलांना तात्काळ मंजुरी दिली जाणार आपले ची माहिती मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow