BIG NEWS : दुचाकी आणि ट्रकचा अपघात; एक जण ठार तर एक गंभीर जखमी
आय मिरर
लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गवरील अहमदपूरच्या थोरलेवाडी पाटीजवळ ट्रॅक आणि दुचाकीचा अपघात झाला आहे.यामध्ये एक जण जागीच मृत्यू झाला आहे.तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमींवर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
शिरूर ताजबंद कडून नांदेड कडे जाणारा ट्रक क्र. एम. एच.26 बी. इ.7011 आणि थोरले वाडी कडून अहमदपूरकडे येणाऱ्या मोटारसायकल क्र. एम. एच.24.वाय. 7901 वरील दुचाकीस जोराची धडक दिली आहे.विजय शेषेराव सोमावसे वय वर्ष 35 रा .नांदूरा खुर्द हे जागीच ठार तर अमर बाबुराव पुट्टेवाड वय वर्ष 35 रा.नांदुरा बुद्रुक हा गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन 108 च्या रुग्णवाहिकेत दोघांना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले असता अमर पट्टेवाड यास अहमदपूर ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले तर विजय शेषेराव सोमावसे यास अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे स्वेच्छेदनासाठी घेऊन आले पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत.
What's Your Reaction?