ती मूल होत नसल्याने मांत्रिकाकडे गेली, पण मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली मंत्र उच्चारत तिच्यावर लैंगिक अत्याचार

Feb 11, 2025 - 19:27
 0  2272
ती मूल होत नसल्याने मांत्रिकाकडे गेली, पण मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली मंत्र उच्चारत तिच्यावर लैंगिक अत्याचार

आय मिरर 

अमरावतीमध्ये विवाहितेवर मांत्रिकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मूल होत नसल्याने पीडित महिला मांत्रिकाकडे गेली होती. मांत्रिकाची या महिलेवर वाईट नजर गेली.

त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मूल होत नसल्याने उपचार करतो म्हणत अमरावतीमध्ये एका मांत्रिकांने २० वर्षाच्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार केले. अमरावतीच्या गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

पीडित महिलेच्या डोक्यावर मांत्रिकाने मंत्र उच्चारत तिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केले. पोलिसांनी मांत्रिकाविरोधात बलात्कार तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला. दिगंबर रतन चव्हाण असे या मांत्रिकाचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow