इंदापूर मध्ये दुचाकीचा भीषण अपघात,चालक जागीच ठार
आय मिरर (निलेश मोरे)
इंदापूर तालुक्यातील पोंधवडीत मध्ये दुचाकीचा भीषण अपघात झालाय. पोंधवडी अकोले रोडवर भरधाव वेगात असलेल्या दुचाकी वरील चाणकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे .यामध्ये दुचाकी वरील चालक जागीच ठार झाल्याची माहिती भिगवन पोलिसांनी दिलीय.अजय सुभाष शिंदे वय 25 वर्षे असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचं नाव असून तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आहे.
हि घटना पोंधवडी गावचे हद्दीत (ता.इंदापुर) येथे शनिवारी (दि.८) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वडिलांनी सुभाष दामोदर शिंदे, वय.४८ वर्षे व्यवसाय. शेती, रा बिटले, ता. मोहळ, जि. सोलापूर, यांनी भिगवण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात ट्रॅक्टर वाहनचालक विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय शिंदे हा KTM कंपनीची मोटरसायकल (MH.13.DD.9394) गाडी वरून घरी जात असताना गाडी भरधाव वेगात ट्रॅक्टरच्या पाठीमागून येवून जोराची धडक बसुन त्याचा तोंडास व डोक्यास दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची खबर न देता वाहनचालक निघून गेला आहे. म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात ट्रॅक्टर वाहनचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महागंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खाडे करीत आहेत
What's Your Reaction?