"ते बनावट सोने तारण म्हणून ठेवायचे आणि लाखो उकळायचे"अखेर आले पोलिसांच्या जाळ्यात

Feb 12, 2025 - 07:37
Feb 12, 2025 - 08:33
 0  883
"ते बनावट सोने तारण म्हणून ठेवायचे आणि लाखो उकळायचे"अखेर आले पोलिसांच्या जाळ्यात

आय मिरर 

अकोल्यात बनावट सोने तारण म्हणून ठेवून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल आहे. बनावट असणारा सोनं खाजगी फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवून कंपन्यांकडून कर्ज घेऊन ते कंपन्यांची फसवणूक करत होते मात्र अखेर त्यांच्या या कृत्याची भांडाफोड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अकोल्यात खदान पोलिसांनी बनावट सोने प्रकरणी तिघांना अटक केली आहे. दरम्यान सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीत बनावट सोने ठेवून काही तरुणांनी कर्ज घेतले होते. मंगळवारी बँकेत सोने गहाण ठेवण्यासाठी गेलेल्या तरुणावर बँकेला संशय आल्याने बनावट सोन्याचे हे प्रकरण उघडकीस आले.

या प्रकरणी खदान पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून बनावट सोने जप्त केले.दरम्यान खाजगी फायनान्स कंपनीच्या जठारपेठ शाखेत बनावट सोन्याच्या अंगठ्या सोने तारण ठेवून 2 लाख 37 हजार रुपयाची उचल केली होती. 

दरम्यान फसवणूक करणाऱ्या या टोळीचा खदान पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुख्य आरोपी फरार असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या टोळीतील आरोपी आशुतोष पारसकर, यश उईके आणि चेतन अवताडे हे बनावट सोने घेऊन विद्यानगर शाखेत कर्ज घेण्यासाठी गेले होते. मात्र, फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ते सोने बनावट असल्याचे ओळखले आणि आरोपींना तत्काळ रोखून ठेवले. ब्रँच मॅनेजरने याबाबत खदान पोलिसांना माहिती दिली.

खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघा जणांना अटक केली. तपासादरम्यान, मुख्य आरोपी रोहित गोगटे याने यापूर्वीही याच कंपनीत सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याचे उघड झाले. मात्र, आता तो फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow