टोमॅटो वाहतूक करणारा टेम्पो इंदापूर हद्दीत पलटी,रस्त्यावर झाला लाल चिखल…

May 31, 2024 - 22:22
May 31, 2024 - 22:24
 0  966
टोमॅटो वाहतूक करणारा टेम्पो इंदापूर हद्दीत पलटी,रस्त्यावर झाला लाल चिखल…

आय मिरर

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक पाटीजवळ टोमॅटो वाहतूक करणारा टेंम्पो पलटी झाल्याने रस्त्यावर टोमॅटो लाख चिखल पहायला मिळाला.

हा टेंम्पो नारायणगाव येथून सोलापूर वरुन बेंगलोर च्या दिशेने जाणार होता मात्र पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी येथे उड्डानपुलाचे काम सुरु असल्यानं अरुंद रस्त्यावरुन वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.चालकाला खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जातयं.

क्रेनच्या सहाय्याने हा अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला आहे. या अपघातात टेम्पोचे आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow