बहिणींना आधी एक शब्द दिला आणि तो आता फिरवला जातोय हे दुर्दैव - खासदार सुप्रिया सुळे

आय मिरर
काँग्रेसने जागा वाटपात शेवटपर्यंत घातलेला घोळ हा अनाकलनीय असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या की, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळे करण्याचा अधिकार आहे. आणि पत्रकारिता पारदर्शक असली पाहिजे. आमच्यावरही अनेक वर्तमानपत्रातून टीका होतात. एकमेकांच्या धोरणांबाबत सशक्त लोकशाहीमध्ये टीका करणं असं झालंच पाहिजे. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराज येथे महाकुंभला जाण्यासाठी लोकांचा मोठा जमाव वेगवेगळ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी जमला होता. शनिवारी रात्री उशिरा गर्दी वाढल्याने स्थानकात चेंगराचेंगरी झाली. यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, ही दुर्दैवी घटना झाली आहे. या आधीही रेल्वेची दुर्घटना घडली होती. सरकारने या घटनांची पारदर्शकपणे चौकशी केली पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
इंडिया आघाडीच्या धोरणावर बोलताना सुळे म्हणाल्या की, काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल व शिवसेना यांच्यात दिल्ली येथे भेट झाली.या बैठकीत नेमके काय बोलणे झाले हे माहित नाही. होत असलेली टीका कोणत्या दृष्टिकोनातून झाली. हे त्यांच्याशी बोलल्यावरच समजेल. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी खंत व्यक्त केली. या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सुसंस्कृत राजकारणामध्ये केवळ यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून सुसंस्कृतपणा येत नाही. त्यासाठी आपण कृतीही तशी केली पाहिजे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोणाचे मन दुखावले जाणार नाहीत यासाठी प्रयत्न करणार आहोत. असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेबाबत लावण्यात येणाऱ्या निकषावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, याबाबत मला काहीही आश्चर्य वाटत नाही.ही योजना चांगली आहे आमच्या सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रुपये देणार होतो. आणि एकही महिला कमी केली नसती. कारण याबाबत आम्ही विचारपूर्वक योजना तयार केली होती. मात्र दुर्दैव आहे की, बहिणींना आधी एक शब्द दिला आणि तो आता फिरवला जात आहे. आणि महाराष्ट्रातील बहिणींचा अपमान केला जात आहे.
What's Your Reaction?






