इंदापुरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी का दिला राजकीय पुढाऱ्यांना गर्भित इशारा
आय मिरर
सततच्या होणाऱ्या पावसामुळे इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीचा पूर्वेकडील बुरुज ढासळला गेलाय. यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त होत भिगवण पोलिसांना लेखी निवेदन देत यापुढे राजकीय नेत्यांनी मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संदर्भात कोणतीही घोषणा केल्यास त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा गर्भित इशारा दिला आहे.
महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर येथील गढीची दुरूस्ती शासन करीत नसलेमुळे भविष्यात राज्यकर्त्यांनी गढीबाबतची कोणतीही घोषणा करू नये अन्यथा राज्यकर्त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही.असा गर्भित इशारा अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष अँड.पांडुरंग जगताप यांनी दिला असून त्या संदर्भातील लेखी निवेदन बुधवारी दि.०४ ऑक्टोंबर रोजी भिगवण पोलिसांना देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजी राजेभोसले यांची ऐतिहासिक गढी इंदापूर शहरामध्ये आहे.ही गढी जीर्ण झाली आहे. बांधकाम पूर्णता मोडकळीस आलेले आहे. शिवप्रेमींनी यापूर्वी अनेक वेळा शासन व राजकीय नेते यांच्याकडे पाठपुरावा करूनही सदर गढीची दुरुस्ती केलेली नाही.दोन्ही ही माजी मत्र्याडून आजपर्यंत शिवप्रेमींना केवळ पोकळ आश्वासनेच मिळाली असून दोघांकडून ही केवळ या मुद्यावर आपापली राजकीय पोळी भाजली जाते. राज्याचे मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी हि सदर गढीच्या संवर्धनाबाबत पोकळ आश्वासन दिले असून याचीही कोणताही पूर्तता झालेली नाही.एकंदरीत शासनाची फार गरीबी चालू आहे अस उपरोधिक टोला जगताप यांनी लगावला आहे.
इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमींनी तहसीलदार इंदापूर यांना लेखी पत्र देऊन सदर गढीची दुरुस्ती श्रमदानातून करण्यास परवानगी मागितली असून या मागणीला अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. शिवाय श्रमदानाच्या कामात अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे जगताप यांनी जाहिर केले आहे.
यावेळी ॲड.पांडुरंग जगताप ,राजकुमार मस्कर ,शंकरराव गायकवाड, प्रशांत गायकवाड,अशोक साळुंखे,सुभाष फलफले, भरत मोरे, सुनील काळे, अजिंक्य माडगे, रणजीत जाधव,विशाल धुमाळ,हर्षवर्धन ढवळे, दत्तात्रय जाधव, अमोल जगदाळे,अभयसिंह राजेभोसले,संदीप गुंडाळे, अभिजीत जगदाळे, सुहास भोसले,विलास झांजूर्णे, ग्रंथपाल दादा रणसिंग आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?