इंदापूरच्या भीमाई आश्रमशाळेत मातोश्री रमाबाईंना अभिवादन

Feb 8, 2024 - 10:04
 0  116
इंदापूरच्या भीमाई आश्रमशाळेत मातोश्री रमाबाईंना अभिवादन

आय मिरर

इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी केली.

या वेळी संस्थेचे सचिव अँड. समीर मखरे यांच्या हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार, तथागत गौतम बुद्ध मूर्तीस व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी रमाईंच्या जीवनावर आधारित गीतं गायली.

या वेळी मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मनोगतातून माता रमाईंचा जीवनपट मांडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयाच्या प्राचार्या अनिता साळवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow